पंतप्रधान मोदींचं घड्याळ चर्चेत! ‘रोमन बाग’मध्ये नेमकं खास काय?

Monika Shinde

मोदींच्या घड्याळाकडे साऱ्यांचे लक्ष

पंतप्रधान मोदी यांनी परिधान केलेले ‘रोमन बाग’ घड्याळ चर्चेचा विषय ठरले आहे. भारतीय वारसा आणि आधुनिक लक्झरी यांचा सुंदर संगम यात दिसतो.

डायलमध्ये दडलाय इतिहास

या घड्याळाच्या डायलवर 1947 मधील एक रुपयाचे मूळ नाणे बसवले आहे. चालणाऱ्या वाघाची प्रतिमा भारताच्या स्वातंत्र्याची आठवण करून देते.

इंडियन हेरिटेजची अनोखी ओळख

‘रोमन बाग’ घड्याळ भारतीय संस्कृती, कलात्मकता आणि परंपरेचे प्रतिबिंब आहे. मेक इन इंडिया संकल्पनेला साजेशी ही रचना स्वदेशी अभिमान जागवते.

मजबूत स्टील बॉडीची ताकद

316L स्टेनलेस स्टीलच्या मजबूत केससह 43 मिमी आकाराचे हे घड्याळ टिकाऊपणासाठी ओळखले जाते. दैनंदिन वापरासाठी देखील योग्य.

मियोटा मूव्हमेंटची अचूकता

यात वापरलेला जपानी मियोटा ऑटोमॅटिक मूव्हमेंट घड्याळाला परफेक्ट वेळ दाखवण्याची क्षमता देतो. विश्वसनीयता आणि स्थिरता या याची वैशिष्ट्ये आहेत.

पारदर्शक केस-बॅकची आकर्षक झलक

पारदर्शक केस-बॅकमुळे घड्याळातील यांत्रिक हालचाल स्पष्ट दिसते. घड्याळप्रेमींना हे एक कलात्मक आणि तांत्रिक अनुभव देते.

किंमत किती आहे?

‘रोमन बाग’ची बाजारातील किंमत साधारण 55,000 ते 60,000 दरम्यान आहे. भारतीय कारागिरीच्या तुलनेत हा प्रीमियम अनुभव योग्य मानला जातो.

जयपूर वॉच कंपनीची ओळख

हे घड्याळ जयपूर वॉच कंपनीचे आहे. भारतीय नाणी, स्टॅम्प्स आणि सांस्कृतिक प्रतीकांना लक्झरी घड्याळांत रूपांतरित करण्यासाठी कंपनी प्रसिद्ध आहे.

इंदिरा गांधींबद्दल 'ही' 7 रंजक गोष्टी माहिती आहेत का?

येथे क्लिक करा