मोदींच्या गेल्या 10 वर्षांतील लूकची खास झलक

पुजा बोनकिले

फेटा

2014 पासून स्वातंत्र्यदिनी रंगीबेरंगी पगडी/फेटा परिधान करण्याची परंपरा नरेंद्र मोदींनी सुरु केली. जाणून घेऊया या १० वर्षात पंतप्रधान कोणकोणत्या रंगातील कपड्यांमध्ये दिसले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन सलग दहाव्यांदा ध्वजारोहण केलं आणि देशाला संबोधित केलं. लाल किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या लांबीसह त्यांनी परिधान केलेल्या कपडे आणि पगडी/फेट्याचीही कायम चर्चा आहे.

स्वातंत्र्यदिन

2014 साली पंतप्रधान बनल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला खास प्रकारची पगडी अथवा फेटा परिधान केला आहे. ती परंपरा यंदाच्या स्वातंत्र्यदिनालाही कायम राहिली.

फेट्याचा रंग

मागच्या वर्षी त्यांनी आपल्या फेट्याचा रंग आणि स्टाईल बदलली होती. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्रीय ध्वज असलेला पांढऱ्या रंगाचा फेटा पाहायला मिळाला होता. तसंच त्यांनी पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यावर निळ्या रंगाची जॅकेट परिधान केला होता.

2021

2021 मध्ये त्यांनी केशरी रंगाचा फेटा बांधला होता, ज्याचा मागील भाग त्यांच्या गमछाच्या किनाऱ्याशी जुळता होता.

2020

तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीम आणि केशरी रंगाची पगडी परिधान केली होती. त्यावर्षी मोदींनी भगवी किनार असलेलं पाढरं उपरणंही परिधान केलं होतं.

2019

वर्ष 2019 मध्ये पंतप्रधानांनी रंगीबेरंगी फेटा परिधान केला होता. लाल किल्ल्यावरील त्यांचं हे सहावं संबोधन होतं.

2018

पंतप्रधानांनी 2018 मध्ये त्यांनी कुर्ता परिधान केला होता तर त्यांच्या पगडीचा रंग गडद केशरी आणि लाल होता.

2017

पंतप्रधानांनी 2017 मध्ये हाफ स्लीव्हचा कुर्ता आणि चमकदार लाल-पिवळ्या रंगाची पगडी परिधान केली होती

2016

2016 मध्ये पंतप्रधान मोदी साध्या कुर्ता आणि चुडीदार पायजम्यात दिसले होते. यासोबतच त्यांनी लाल-गुलाबी आणि पिवळ्या रंगाची राजस्थानी साफा परिधान केला होता.

2015

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये क्रीम कलरचा कुर्ता आणि खादी रंगाचं जॅकेट घातलं होतं. त्यावेळी त्यांनी लाल आणि हिरव्या रंगाची पट्टी असलेली पगडी परिधान केली होती.

2014

2014 मध्ये स्वातंत्र्यदिनाला नरेंद्र मोदी यांनी भगवा आणि हिरव्या रंगाचा जोधपुरी बांधणीचा फेटा बांधला होता.

2025

यंदाच्या स्वातंत्र्य दिनासाठी पंतप्रधान मोदींनी पांढरा कुर्ता आणि चुडीदार परिधान केला आहे. त्यावर त्यांनी अबोली रंगाची जॅकेट आणि भगवा रंगाचा फेटा परिधान केला आहे. या पारंपारिक लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

PM modi | Sakal

स्वातंत्र्यदिनाच्या लाँग वीकेंडला फिरायला जाण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Independence Day 2025 long weekend travel safety checklist | Sakal
आणखी वाचा