मोदींच्या विकासाला GTA 6चा तडका! गेमिंग स्टाईलमधून दाखवला भारताचा विकास; Photos Viral

Anushka Tapshalkar

भारत आता खेळतोय नवा गेम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर GTA 6 या लोकप्रिय व्हिडीओ गेमच्या थीमवर आधारित काही खास ग्राफिक्स शेअर केले आहेत. 'India is playing a whole new game!' असं म्हणत त्यांनी २०१३ आणि २०२६ मधील भारताच्या प्रगतीची तुलना केली आहे.

PM Modi GTA 6 Social Media Post

|

Twitter/X

अर्थव्यवस्थेत मोठी झेप

२०१३ मध्ये भारताचा समावेश 'Fragile Five' म्हणजेच आर्थिकदृष्ट्या अस्थिर मानल्या जाणाऱ्या पाच देशांमध्ये होता. मात्र, आता भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचं या ग्राफिकमध्ये दाखवण्यात आलं आहे.

Economic Growth

|

Twitter/X

गरिबीच्या प्रमाणात घट

पंतप्रधानांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील अत्यंत गरिबीचं प्रमाण २०१३ मधील २७ टक्क्यांवरून कमी होऊन २.६ टक्क्यांवर आलं आहे.

Poverty Reduction

|

Twitter/X

स्वच्छतेच्या बाबतीत मोठा बदल

स्वच्छ भारत मिशनमुळे देशातील स्वच्छता सुविधांमध्ये मोठी वाढ झाल्याचं ग्राफिकमध्ये नमूद करण्यात आलं आहे. २०१३ मध्ये स्वच्छता सुविधांचं कव्हरेज ३९ टक्के होतं, तर आता ते १०० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.

Swaccha Bharat Abhiyan

|

Twitter/X

सौरऊर्जा निर्मितीत मोठी वाढ

नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केल्याचं या ग्राफिकमध्ये दाखवण्यात आलं आहे. २०१३ मध्ये भारताची सौरऊर्जा क्षमता २.८२ गिगावॅट होती. आता ती वाढून १७५ गिगावॅट झाल्याचं पोस्टमध्ये नमूद आहे.

Solar Capacity

|

Twitter/X

अंतराळ क्षेत्रात स्टार्टअप्सची वाढ

भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीकडेही या पोस्टमधून लक्ष वेधण्यात आलं आहे. २०१३ मध्ये अंतराळ क्षेत्रात केवळ एक स्टार्टअप होतं, तर आता ही संख्या वाढून ४४० झाल्याचं ग्राफिकमध्ये दाखवलं आहे.

Space Startup Boom

|

Twitter/X

रेल्वे विद्युतीकरणात प्रगती

भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणातही मोठी वाढ झाल्याचं या पोस्टमध्ये दाखवलं आहे. २०१३ मध्ये रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण २० टक्के होतं, तर आता ते ९९.६ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात आलं आहे.

Electrification Level Up

|

Twitter/X

इंटरनेट डेटा झाला स्वस्त

डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत भारतात मोठा बदल झाला आहे. २०१३ मधील 3G काळात १ जीबी डेटासाठी ३०८ रुपये मोजावे लागत होते. आता 5G च्या काळात हाच डेटा ७.५१ रुपयांना उपलब्ध असल्याचं पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Internet Price Drop

|

Twitter/X

संरक्षण क्षेत्रात निर्यातदार म्हणून ओळख

२०१३ मध्ये भारत मोठ्या प्रमाणावर संरक्षण साहित्य आयात करणारा देश होता. मात्र, आता भारत ८० हून अधिक देशांना संरक्षण साहित्य निर्यात करत असल्याचं या ग्राफिकमध्ये दाखवण्यात आलं आहे.

Global Defense Market

|

Twitter/X

नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या शून्यावर?

देशातील अंतर्गत सुरक्षेच्या स्थितीवरही या पोस्टमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. २०१३ मध्ये नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या १८२ होती, तर आता ती शून्यावर आल्याचं पंतप्रधानांनी शेअर केलेल्या ग्राफिकमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Reduced Naxal-Affected Districts 

|

Twitter/X

धोनीने IPL मध्ये किती फोर अन् किती सिक्स मारले? पाहा संपूर्ण कामगिरी

MS Dhoni IPL Career Stat

|

Sakal

आणखी वाचा