Puja Bonkile
मोदी सरकार ३.० चा भव्य शपथविधी सोहळा ९ जूनला संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला.
यासह देशात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे.
नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
या सोहळ्यात त्यांनी घातलेल्या जॅकेटने सर्वांचे लक्ष वेधले होते.
शपथविधी सोहळ्यात त्यांनी पांढऱ्या रंगाचा कुर्तासोबत चुरीदार पायजमा आणि निळ्या रंगाचे जॅकेट घातले होते.
तसेच काळ्या रंगाच्या शूजसह त्यांनी लूक पुर्ण केला होता.
पंतप्रधान मोदींच्या या लूकने सर्वाचे लक्ष वेधले होते.
पीएम मोदी नेहमी खास प्रकराचे जॅकेट घालतात, तसेच त्यांचे जॅकेट 'मोदी जॅकेट' नावाने प्रसिद्ध झाले आहे.
निळा रंग हा स्थिरता, ज्ञान, आत्मनिरीक्षण आणि आध्यात्मिकचे प्रतिक मानला जातो. हा रंग भावना, ज्ञान आणि संवेदनशीलता दर्शवतो.