पुजा बोनकिले
मोबाईल गेमिंग तसेच Gen-Z साठी Poco F7 हा खास फोन १ जुलै रोजी ऑनलाइन खरेदी करता येणार आहे.
उद्या खरेदी केल्यास कोणते ग्राहकांना कोणत्या ऑफर्स मिळणार आहेत हे जाणून घेऊया.
Poco F7 फोनची विक्री १ जुलैपासून फक्त फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.
तुम्हाला १२+२५६ जीबी व्हेरिएण्टसाठी किंमत २९,९९९ रूपये आणि १२+५१२ जीवी व्हेरिएण्टसाठी किंमत ३१,९९९ रूपये मोजावी लागणार आहे.
फर्स्ट सेल डे ऑफरचा भाग म्हणून ग्राहक एचडीएफसी, एसबीआय किंवा आयसीआयसीआय बँक कार्ड्सचा वापर करत २,००० रूपयांची त्वरित बँक सूटचा, तसेच २,००० रूपये एक्स्चेंज बोनसचा आनंद घेऊ शकतात
जे बँक ऑफरसह स्वतंत्रपणे किंवा एकत्रित मिळू शकतात.
याव्यतिरिक्त, Poco १०,००० रूपयांचे १-वर्ष मोफत स्क्रिन डॅमेज प्रोटेक्शन आणि १-वर्ष विस्तारित वॉरंटी देत आहे, ज्यामुळे एकूण वॉरंटी कव्हरेज २ वर्षांपर्यंत आहे.
हे लाँच डे फायदे फक्त १ जुलै रोजी डिवाईस खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आहेत.
यामुळे Poco F7 बॅटरीचा पॉवरहाऊस खरेदी करण्यासाठी खास डिलचा लाभ घेऊ शकता.