डाळींबाच्या सालाचे त्वचा आणि केसांसाठी आहेत 7 DIY उपाय

Anushka Tapshalkar

डाळींबाचं साल आणि दही फेशियल पॅक

एक चमचा डाळींबाची साल पावडर आणि १–२ चमचे दही एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा आणि मानावर लावा. १५–२० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा उजळते आणि मऊ होते.

Yoghurt Facepack

| esakal

डाळींबाचं साल आणि गुलाब जल

एक चमचा डाळींबाची साल पावडरमध्ये आवश्यकतेनुसार गुलाब जल मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट मुरुम असलेल्या भागावर लावा. १५ मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे अतिरिक्त तेल नियंत्रणात राहते आणि मुरुम कमी होण्यास मदत होते.

Gulab jal

|

sakal

डाळींबाचं साल आणि मध

एक चमचा डाळींबाची साल पावडर आणि एक चमचा मध एकत्र मिसळा. हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. सुमारे २० मिनिटांनी पाण्याने धुवा. यामुळे त्वचा लवचिक राहते आणि सूक्ष्म रेषा कमी होण्यास मदत होते.

Honey

|

Sakal

डाळींबाचं साल स्क्रब

एक चमचा डाळींबाची साल पावडर, एक चमचा साखर आणि काही थेंब लिंबाचा रस एकत्र मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर हलक्या हाताने वर्तुळाकार हालचालीत स्क्रब करा. ३–५ मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे मृत त्वचा दूर होते आणि टॅन कमी होतो.

Face Scrub

| sakal

डाळींबाचं साल आणि नारळ तेल

दोन चमचे डाळींबाची साल पावडर आणि तीन चमचे कोमट नारळ तेल एकत्र करा. हे मिश्रण टाळूवर हलक्या हाताने मसाज करून लावा. ३०–४५ मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा. यामुळे डँड्रफ कमी होण्यास मदत होते आणि खाज कमी होते.

Coconut Oil

|

sakal

डाळींबाचं साल आणि आवळा पावडर

एक चमचा डाळींबाची साल पावडर आणि एक चमचा आवळा पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट टाळू आणि केसांवर लावा. सुमारे ३० मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसांच्या मुळांना मजबुती मिळते.

amla powder | sakal

डाळींबाच्या सालाचा हर्बल रिन्स

कोरड्या डाळींबाच्या साली दोन कप पाण्यात सुमारे १० मिनिटे उकळा. पाणी थंड झाल्यावर ते गाळून घ्या. शॅम्पूनंतर हे पाणी शेवटच्या रिन्ससाठी वापरा. यामुळे केस नैसर्गिकरीत्या मऊ आणि चमकदार दिसतात.

Rinse Hair with Pomogranate Juice | sakal

रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा 'या' तेलाचे २ थेंब; ५ दिवसांत दिसेल फरक!

आणखी वाचा