युट्युबवर लोकप्रिय ठरलेल्या 'सनम तेरी कसम' सिनेमाने रि-रीलिजमध्ये कमावले इतके कोटी

kimaya narayan

सनम तेरी कसम

बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊन सोशल मीडियावर हिट असलेला सिनेमा म्हणजे सनम तेरी कसम

Sanam Teri Kasam

कास्ट

हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती.

Sanam Teri Kasam

कथानक

तामिळ ब्राह्मण कुटूंबात जन्मलेली एक साधारण मुलगी आणि वकील असलेला पण दारूच्या नशेत बुडालेला तरुण यांची वेगळी लव्हस्टोरी या सिनेमात पाहायला मिळाली.

Sanam Teri Kasam

रिलीज आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन

2016 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता आणि या सिनेमाने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर 18 करोड रुपयांची कमाई केली होती. हा सिनेमा फ्लॉप ठरला होता.

Sanam Teri Kasam

युट्युबवर सुपरहिट

लॉकडाऊन दरम्यान हा सिनेमा युट्युबवर रिलीज झाला आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला.

Sanam Teri Kasam

रि रिलीज

2024 पासून सिनेमांचं पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची लाट आली. 7 फेब्रुवारी 2025 ला हा सिनेमा पुन्हा रिलीज झाला.

Sanam Teri Kasam

कमाई

अवघ्या तीन दिवसात या सिनेमाने पहिल्या रिलीजच्या कमाईबरोबर जवळपास बरोबरी केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने 4.25 करोड, दुसऱ्या दिवशी 5.25 करोड आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 6.25 करोड रुपये कमावले. तीन दिवसात सिनेमाने 15.50 करोड कमावले जे मूळ सिनेमाच्या कमाईच्या 170%अधिक रक्कम आहे.

Sanam Teri Kasam

तगडी टक्कर

हा सिनेमा लव्हयाप्पा या नुकत्याच रिलीज झालेल्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर देतोय.

Sanam Teri Kasam
Andaz Apna Apna | esakal
सलमान आणि आमीरचं झालेलं मोठं भांडण - येथे क्लिक करा