Anushka Tapshalkar
चेहरा स्वच्छ केल्यानंतर त्वचेवरील उरलेली घाण काढण्यासाठी, त्वचेला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि मॉइश्चरायझर लावण्यापूर्वी स्किनकेअर रुटीनचा भाग म्हणून टोनर वापरता येतो. महागड्या टोनरऐवजी घरच्या घरीही काही सोपे टोनर बनवता येतात.
Homemade Toners for Glowing and Radiant Skin
sakal
गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करते. स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये शुद्ध गुलाबपाणी भरून चेहऱ्यावर स्प्रे करा किंवा कॉटन पॅडने लावा.
Homemade Toners for Glowing and Radiant Skin
sakal
तांदळाच्या पाण्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास आणि चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी दिसण्यास मदत होऊ शकते. अर्धा कप तांदूळ एक कप पाण्यात ३० मिनिटे भिजवा. नंतर पाणी गाळून फ्रिजमध्ये ठेवा.
Homemade Toners for Glowing and Radiant Skin
sakal
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण मिळण्यास मदत होते. ग्रीन टी तयार करून पूर्ण थंड करा आणि कॉटन पॅडच्या मदतीने चेहऱ्यावर लावा.
Homemade Toners for Glowing and Radiant Skin
sakal
कोरफड त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि शांत ठेवण्यास मदत करते. एक चमचा ताज्या कोरफडीच्या गरात एक कप पाणी मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित हलवून चेहऱ्यावर लावा.
Homemade Toners for Glowing and Radiant Skin
sakal
काकडीचा थंडावा त्वचेला ताजेतवाने ठेवतो. एक काकडी मिक्सरमध्ये वाटून तिचा रस गाळा. त्यात समान प्रमाणात पाणी मिसळा आणि कॉटन पॅडने चेहऱ्यावर लावा.
Homemade Toners for Glowing and Radiant Skin
sakal
घरगुती टोनर वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा. प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने नैसर्गिक घटकांमुळेही अॅलर्जी किंवा जळजळ होऊ शकते. ताजे टोनर कमी प्रमाणात तयार करा, फ्रिजमध्ये ठेवा आणि खराब झाल्यास वापरू नका.
Homemade Rosemary Water
Sakal