केसांच्या समस्यांवर फायदेशीर 'रोझमेरी वॉटर' बनवा घरच्या घरी!

Pranali Kodre

Rosemary Water

केसांच्या आणि टाळूच्या आरोग्यासाठी रोझमेरी वॉटर (Rosemary Water) अत्यंत लोकप्रिय आणि नैसर्गिक उपाय आहे.

Homemade Rosemary Water

|

Sakal

केसांच्या वाढीस प्रोत्साहन

रोझमेरी वॉटरमुळे टाळूमधील रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते, त्यामुळे केसांच्या मुळांना (Hair Follicles) पोषण मिळून केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.

Homemade Rosemary Water

|

Sakal

केसांची मुळं मजबूत

रोझमेरीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स केसांची मुळं मजबूत करतात आणि त्यांच तुटणं थांबवतात.

Homemade Rosemary Water

|

Sakal

टाळूची जळजळ आणि खाज शांत

याशिवाय रोझमेरीमध्ये नैसर्गिक अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असून त्यामुळे टाळूची जळजळ आणि खाज शांत करतात.

Homemade Rosemary Water

|

Sakal

घरी बनवणे अगदी सोपे

हे रोझमेरी वॉटर घरच्या घरी बनवणे अगदी सोपे आहे.

Homemade Rosemary Water

|

Sakal

साहित्य :

३-४ रोजमेरीच्या ताज्या फांद्या किंवा १-२ चमचे वाळलेली रोझमेरी, २ कप स्वच्छ पाणी, लहान पातेलं, गाळण आणि बॉटल

Homemade Rosemary Water

|

Sakal

१५-२० मिनिटे उकळा

रोजमेरीच्या फांद्या धुवून घेऊन छोट्या पातेल्यात पाणी मंद आचेवर उकळायला ठेवून त्यात टाका. पाण्यावर झाकण ठेवून ते १५-२० मिनिटे उकळू द्या.

Homemade Rosemary Water

|

Sakal

पाणी थंड होऊ दे

नंतर गॅस बंद करून पातेल्यावरील झाकण तसंच ठेवून हे पाणी थोडं थंड होऊ द्या. पाण्याचा रंग गडद तपकिरी किंवा नारंगी होईल.

Homemade Rosemary Water

|

Sakal

पाणी फ्रीजमध्ये ठेवा

पाणी थंड झाल्यानंतर ते बारीक गाळणीने गाळून एका स्वच्छ बॉटलमध्ये भरून ठेवा. हे पाणी फ्रीजमध्ये ठेवा.

Homemade Rosemary Water

|

Sakal

७-१० दिवस टिकते

हे पाणी साधारण ७-१० दिवस टिकते. पण जर पाण्याचा वास बदलला किंवा खराब झाल्यासारखं वाटलं तर पाणी वापरू नका.

Homemade Rosemary Water

|

Sakal

पॅच टेस्ट

हे पाणी केस धुण्यापूर्वी अर्धा ते एक तासआधी टाळूला आणि केसांना लावता येते. पण वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करा.

Homemade Rosemary Water

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Homemade Rosemary Water

|

Sakal

हिवाळ्यात कमी पाण्यात येणारी प्रमुख ५ पिके

Low-Water Rabi Crops

|

Sakal

येथे क्लिक करा