दिवाळीनंतर वजन कमी करायचंय? हे ६ व्यायाम बर्न करतात सर्वात जास्त कॅलरीज

Anushka Tapshalkar

दिवाळींतरचा फिटनेस

दिवाळीत अनेक प्रकारचे फराळ, ज्यामध्ये तेलकट, तिखट, तूपकट आणि गोड पदार्थांचा समावेश असतो, खाल्ल्यामुळे वजन वाढते. त्यामुळे जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचे असेल तर हे ६ व्यायाम तुमच्या शरीराला टोन करून कॅलरीज जलद गतीने कमी करतील!

Exercises that Burn Maximum Calories

|

sakal

सायकलिंग

घरात किंवा बाहेर सायकल चालवणे हा एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. याची तीव्रता लक्षात घेता, एका तासात ४०० ते १००० कॅलरीज जाळल्या जाऊ शकतात.

Exercises that Burn Maximum Calories

|

sakal

हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT)

थोड्या वेळासाठी तीव्र व्यायाम आणि विश्रांती यांचा समन्वय असलेल्या व्यायामांना HIIT व्यायाम म्हणतात.. हा व्यायाम ५०० ते ९०० कॅलरीजपर्यंत जाळतो आणि चयापचय वाढवतो.

Exercises that Burn Maximum Calories

|

sakal

दोरीवरच्या उड्या

संपूर्ण शरीराला सक्रिय करणारा आनंददायक व्यायाम! एका तासात ६०० ते १००० कॅलरीजपर्यंत जाळल्या जाऊ शकतात.

Exercises that Burn Maximum Calories

|

sakal

पोहणे

संपूर्ण शरीरासाठी उपयुक्त आणि सांध्यांवर कमी दाब देणारा व्यायाम. एका तासात ४०० ते ७०० कॅलरीजपर्यंत जळतात.

Exercises that Burn Maximum Calories

|

sakal

धावणे

हा एक उच्च-तीव्रतेचा कार्डिओ व्यायाम आहे ज्यामध्ये वेग आणि वजनानुसार एका तासात ५०० ते ९०० कॅलरीजपर्यंत जळतात.

Exercises that Burn Maximum Calories

|

sakal

रोइंग (नौकानयन व्यायाम)

वरच्या व खालच्या स्नायूंना मजबूत करणारा व्यायाम. योग्य तीव्रतेने केल्यास एका तासात ४०० ते ६०० कॅलरीज जळतात.

Exercises that Burn Maximum Calories

|

sakal

डिटॉक्सपासून वजन कमी करण्यापर्यंत; हिरव्या भाज्यांमध्ये दडले आहे आरोग्याचे रहस्य

Health Benefits of Eating Leaft Vegetables

|

sakal

आणखी वाचा