Vinayan
शेअर बाजाराच्या रिस्कशिवाय, पूर्णपणे सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारी पोस्ट ऑफिसची ही योजना गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
Post Office Scheme
Sakal
पोस्ट ऑफिसची राष्ट्रीय बचत पत्र (NSC) ही एक अशी अल्प बचत योजना आहे, जिथे तुमच्या पैशांना सरकारची पूर्ण सुरक्षा आणि हमी मिळते.
Post Office Scheme
Sakal
या योजनेवर सध्या वार्षिक ७.७% चक्रवाढ व्याज (Compound Interest) दिले जाते. या योजनेचा मॅच्युरिटी काळ बरोबर ५ वर्षांचा असतो.
Post Office Scheme
Sakal
सामान्य नागरिकांना बचत करता यावी यासाठी या योजनेत किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. यात गुंतवणुकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही.
Post Office Scheme
Sakal
जर तुम्ही या योजनेत एकरकमी ११,५०,००० रुपये (११.५ लाख) गुंतवले, तर ७.७% व्याजदराने ५ वर्षांत केवळ ५,१६,३८९ रुपये फक्त व्याज मिळते!
Post Office Scheme
Sakal
पाच वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर मुद्दल आणि व्याज मिळून गुंतवणूकदाराला एकूण सुमारे १६,६६,३८९ रुपये परत मिळतात.
Post Office Scheme
Sakal
जुन्या करप्रणालीनुसार (Old Tax Regime) या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वर्षाला १.५ लाख रुपयांपर्यंत करसूट मिळवता येते.
Post Office Scheme
Sakal
ज्यांना बाजारातील जोखमीपासून दूर राहून आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित ठेवायचे आहेत आणि निश्चित परतावा हवा आहे, त्यांच्यासाठी एनएससी ही सर्वोत्तम योजना आहे.
Post Office Scheme
Sakal
crime story of the Gavit sisters
Sakal