Vinod Dengale
पोस्ट ऑफिसची एक योजना सध्या चर्चेत आहे. यात तुमच्या महिन्याच्या 1,500 रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 1 लाख 7 हजारांचा मोठा फंड तयार होतो.
पोस्ट ऑफिसची रेकरींग डिपॉजिट म्हणजेच Recurring Deposit (RD) योजना ही याच सुरक्षित गुंतवणुकीसाठी लोकप्रिय पर्याय मानली जाते.
या योजनेला केंद्र सरकारची हमी असल्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षिततेची चिंता नसते. त्यामुळे जोखीम जवळपास शून्य असते.
या योजननेत दरमहा ठराविक रक्कम जमा करून मॅच्युरिटीवेळी मोठा फंड तयार करता येतो.
उदाहरणार्थ 1,500 रुपये दरमहा जमा केल्यास 5 वर्षांत एकूण गुंतवणूक 90,000 रुपयांचे होते तर 6.7% व्याजदरानुसार 5 वर्षांनंतर एकूण 1.07 लाख रुपयांचा फंड होतो.
या योजनेत दरमहा 1,000 रुपये जमा केल्यास 5 वर्षांत ₹60,000 गुंतवणूक होते आणि व्याजासह सुमारे 71,000 रुपयांचा फंड तयार होऊ शकतो.
यात गुंतवणूक करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन काही मिनिटांत RD खाते सुरू करता येते.
Is It Safe to Charge an EV in the Rain?
eSakal