सकाळ डिजिटल टीम
पोस्ट खात्याची आवर्ती ठेव योजना ही सर्व वयोगटातल्या लोकांना बचतीसाठी चांगली योजना आहे.
indian post
Esakal
आवर्ती ठेव योजनेची मुदत ५ वर्षांची असून किमान गुंतवणूक १०० रुपये तर कमाल गुंतवणुकीची मर्यादा नाही.
indian post
Esakal
प्रती महिना दीड हजार रुपये गुंतवले तर मुदतीनंतर १ लाख ७ हजार ४९ रुपये ग्राहकांना मिळतात. आवर्ती ठेव योजनेत पोस्टाकडून ६.७ टक्के व्याजदर देण्यात येतो.
indian post
Esakal
एकट्याचे किंवा जॉइंट अकाउंटही काढता येते. तसंच अल्पवयीन आणि वृद्धांनाही या योजनेत गुंतवणूक करता येते.
indian post
Esakal
चार पेक्षा जास्त वेळा हफ्ता चुकल्यास खाते बंद मानले जाते. त्यानंतर पुढच्या दोन महिन्यात पुन्हा सुरू करता येते. उशिरा हफ्त्यासाठी एक टक्के दंड आकारला जातो.
indian post
Esakal
एक वर्ष खाते सुरू राहिल्यानंतर आणि १२ महिन्यांचे हफ्ते जमा झाल्यानंतर खात्यात असलेल्या रकमेच्या ५० टक्क्यापर्यंत कर्ज मिळू शकते. त्यावर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा २ टक्के अधिक व्याज आकारण्यात येते.
indian post
Esakal
आवर्ती खाते सुरू केल्यानंतर ३ वर्षांच्या आत बंद करता येते. मुदत संपण्याआधी बंद केल्यास बचत खात्याचे व्याज दर लागू होतात.
indian post
Esakal
खातेदाराचा मृत्यू झाल्यास वारस नोंद केलेल्या व्यक्तीला खात्यावरील रकमेवर दावा करता येतो.
indian post
Esakal
Post Office Saving Scheme
Esakal