पोस्टमार्टेम व्हिसेरा म्हणजे काय? तो जपून का ठेवतात?

संतोष कानडे

पोस्टमार्टेम

पोस्टमार्टेम आणि पोस्टमार्टेम व्हिसेरा, हे शब्द तुम्ही कायम ऐकले असतील. व्हिसेराबद्दल आज आपण जाणून घेऊया.

मृत्यू

मृत्यूचं नेमकं कारण काय? हे शोधण्यासाठी पोस्टमार्टेम केलं जातं. मराठीत याला शवचिकित्सा म्हणतात.

वैद्यकीय महाविद्यालय

देशातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि टर्शरी रुग्णालयामध्ये मृतदेहांचं पोस्टमार्टेम केलं जातं.

अवयव

पोस्टमार्टेमध्ये शरीराच्या बाह्य भागाची तपासणी केली जाते आणि दुसऱ्या भागात शरीराच्या अंतर्गत अवयवांची तपासणी केली जाते.

व्हिसेरा

काही संशयास्पद मृत्यूंमध्ये शरीराच्या दोन्ही तपासण्या करुनही मृत्यूचं कारण कळत नाही. अशावेळी व्हिसेरा हा प्रकार पुढे येतो.

रक्त

मृतदेहाचा व्हिसेरा काढून पुढील तपासणीसाठी पाठवला जातो. शरीरातील काही अवयव आणि रक्त काढून ठेवलं जातं, याला व्हिसेरा म्हणतात.

यकृत

पोट, आतडं, यकृत, स्प्लिनचा काही भाग, किडनीचा भाग, २० सीसी ब्लड हे व्हिसेरा म्हणून ठेवतात.

फॉरेन्सिक लॅब

पुढे हा व्हिसेरा केमिकल अॅनालेलिससाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला जातो. यामुळे मृत्यूचं नेमकं कारण लक्षात येण्यास मदत होते.

मृतदेह

काही प्रकरणांमध्ये मृतदेह हा जळलेल्या किंवा कुजलेल्या अवस्थेत असतो. त्या प्रकरणांमध्ये डीएनए, हाडं तपासणीसाठी पाठवले जातात.

मुघलांमध्ये महिलांचा गर्भपात कसा केला जायचा?

येथे क्लिक करा