सकाळ डिजिटल टीम
बटाटा हा खरोखरच भाज्यांचा राजा मानला जातो. जवळजवळ प्रत्येकालाच बटाट्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतो.
यात कार्बोहायड्रेट्स, पोटॅशियम आणि काही प्रमाणात फायबर असतं. मात्र, जास्त प्रमाणात बटाटे खाल्ले तर त्याचा शरीरावर उलटा परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया, जास्त बटाटे खाण्याचे ६ मोठे तोटे..
बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्याचे अति सेवन केल्यास शरीराचे वजन वाढण्याचा धोका अधिक असतो.
बटाट्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे ते रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी बटाटे मर्यादित प्रमाणात खाणं गरजेचं आहे.
बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो. त्यातून पोटफुगी, अपचन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
बटाट्यामधील काही घटकांमुळे गॅस व पोटफुगी होऊ शकते. अति सेवनामुळे पोटदुखी आणि अस्वस्थता वाढू शकते.
बटाट्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं; पण त्याचं जास्त सेवन केल्यास शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढून मूत्रपिंडांवर ताण येऊ शकतो.
बटाट्यामध्ये काही आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा अभाव असतो. त्यामुळे सतत जास्त बटाटे खाल्ल्याने शरीरात या घटकांची कमतरता जाणवू शकते.
थोडक्यात, बटाटा स्वादिष्ट आणि पौष्टिक असला तरी त्याचं अति सेवन टाळणं गरजेचं आहे. संतुलित आहारात बटाट्याचा योग्य समावेश केल्यास तो आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.