सकाळ वृत्तसेवा
बटाटा फक्त खाण्यासाठी नाही, तर त्याचे अनेक घरगुती औषधी उपयोग आहेत. ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.
जर एखादी जागा भाजली असेल, तर त्यावर बटाट्याची साल ठेवा. यामुळे दाह कमी होतो आणि जखम लवकर भरते.
सूर्यप्रकाशामुळे त्वचा रापल्यास, सोललेला किंवा किसलेला बटाटा त्वचेवर घासल्यास ती उजळते आणि मऊ होते.
बटाटे किसून गुडघ्यांवर लावल्यास वेदना कमी होतात. थंडीमुळे होणारे दुखणेही यामुळे कमी होते.
भाजल्यावर किंवा सूज आल्यावर बटाट्याचे स्लाइस लावल्यास त्वचेला लगेच थंडावा मिळतो.
बटाटा चेहऱ्यावर घासल्यास डेड स्किन निघून जाते आणि चेहरा उजळतो. तो एक नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करतो.
चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा रस रोज लावा. यामुळे डाग कमी होण्यास मदत होते.
पायाच्या भेगांवर किसलेला बटाटा लावल्यास होणारी जळजळ कमी होते.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बटाट्याचे पातळ स्लाइस डोळ्यांवर ठेवा. यामुळे थकवा कमी होतो आणि काळी वर्तुळेही कमी होतात.