अडीचशे वर्षांपूर्वी पुण्यातल्या कुंभाराने कशी केली प्लास्टिक सर्जरी?

संतोष कानडे

प्लास्टिक सर्जरी

१७९३ सालच्या मार्च महिन्यामध्ये पुण्यात एका कुंभाराने प्लास्टिक सर्जरी केली होती, असं म्हटलं तर विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे.

ऑपरेशन

या ऑपरेशनची ही आश्चर्यकारक कहाणी १७९४ साली लंडनमधल्या 'द जन्टलमन्स मॅगझिन अँड हिस्टॉरिकल क्रोनिकल'मध्ये 'Chirurgical Operation' या नावाने प्रसिद्ध झाली.

टिपू सुलतान

आठराव्या शतकामध्ये इंग्रज आणि टिपू सुलतान यांच्यात १७९२ साली लढाई झाली. या लढाईमध्ये 'कावसजी' नावाचा मराठा बैलगाडीवान इंग्रजांच्या बाजूने लढत होता.

कावसजी

कावसजीला टिपूच्या सैनिकांनी पकडून कैद केलं आणि त्याचा छळ सुरु केला. यात त्याचं नाक कापलं. कावसजी याने वर्षभरानंतर कैदेतून पलायन केलं.

मराठा शल्यचिकित्सक

कावसजी पुण्यात आला. १९७३च्या मार्च महिन्यामध्ये एका मराठा शल्यचिकित्सक कुंभाराने त्याच्यावर उपचार केले आणि त्याला नाक बसवले.

कृत्रिम

कृत्रिम नाक बसवण्याची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. परंतु भारतातील ही पहिली शस्त्रक्रिया नव्हती.

शस्त्रक्रिया

अगदी प्राचिन काळापासून अशा शस्त्रक्रिया चालत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सिमधील डॉक्टर्स थॉमस क्रुसो आणि जेम्स फिन्डले यांनी करुन ठेवली आहे.

डॉक्टर

हे दोन डॉक्टर शस्त्रक्रियेवेळी हजर होते. ते म्हणतात, कापलेल्या नाकाचा मेणाचा आकार बनवून तो कपाळावर बसवला आणि ज्या ठिकाणची त्वचा कापायची होती तिथे तो मेणाचा भाग बसवून कापला.

मेण

कपाळावरुन कापलेली त्वचा मेणावर पसरवली. खैराच्या झाडापासून बनवलेला कात उगळून त्याचा लेप कापडावर लावला. कापडाच्या काही पट्ट्या त्या जोडलेल्या भागावर ठेवल्या.

सर्जरी

पुढे चार दिवसांनंतर सर्जरी केलेल्या भागावर तुपात भिजवलेला कपडा ठेवला. २५व्या दिवशी जखम भरली. त्यानंतर मग नाकाला हवा तसा आकार दिला गेला.

आजचं हस्तिनापूर नेमकं कसं आहे?

<strong>येथे क्लिक करा</strong>