सकाळ डिजिटल टीम
राफेल हे 4.5 पिढीचे अत्याधुनिक लढाऊ विमान असून, गुप्तता (stealth), अचूक लक्ष्य भेद आणि लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र यांसारखे तंत्रज्ञान वापरते.
यात SNECMA M88-2 इंजिन्स आहेत, जे 75kN थ्रस्ट निर्माण करतात, यामुळे वेग आणि उंची मिळवण्याची क्षमता अत्यंत प्रभावी होते.
राफेल एकमेकांना हवेतच इंधन भरू शकतात, ज्यामुळे त्यांची मोहिमेतील श्रमता वाढते.
हे विमान एकाच वेळी विविध दिशांनी येणाऱ्या धोक्यांवर लक्ष्य करून हल्ला करू शकते.
राफेल टोही, जमिनीवरील हल्ले, समुद्रावरील लक्ष्ये, आण्विक प्रतिरोध (nuclear deterrence) यासाठी उपयुक्त आहे.
भारतीय राफेलमध्ये इस्रायली हेल्मेट-माउंट डिस्प्ले, लो-बँड जॅमर, आणि दीर्घकालीन फ्लाइट डेटा रेकॉर्डिंग यांसारख्या विशेष प्रणाली आहेत.
वायुदलाला हवेतील लढायांमध्ये स्पष्ट वर्चस्व देण्यासाठी राफेल महत्त्वाची भूमिका बजावते.
स्काल्प, मेटिओर, आणि मिका यांसारखी क्षेपणास्त्रे वापरून राफेल अचूकतेने लक्ष्याचा नायनाट करते.