Kolhapuri Chappal : 'प्राडा'वरून राडा, आंतरराष्ट्रीय ब्रँडने केली कोल्हापुरी चप्पलची चोरी; नेटीझन्सनी धुतला

Sandeep Shirguppe

प्राडा फॅशन कंपनी

मिलान येथील ‘प्राडा स्प्रिंग समर २०२६’ शो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘प्राडा’ फॅशन कंपनीने एका सादरीकरणात जगप्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलचा उल्लेख सँडल असा केला.

Kolhapuri Chappal | esakal

कोल्हापुरी चप्पलची चोरी

मॉडेल्सकडून सादर केलेली चप्पल ही कोल्हापुरी चपलेसारखीच असली तरी, प्राडाने कोल्हापुरी कारागिरांना कोणतेही श्रेय दिले नाही. याबद्दल नाराजी पसरली आहे.

Kolhapuri Chappal | esakal

कोल्हापुरी चप्पलचीच नक्कल

रॅम्पवॉकमध्ये मॉडेल्सच्या पायात दिसणारी चप्पल ही कोल्हापुरी चप्पलचीच नक्कल असताना, प्राडाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर टीकास्त्र सुरू आहे.

Kolhapuri Chappal | esakal

सोशल मीडियावर चर्चा

‘एक्स’वर एका यूजरने प्राडा एसएस २६ मध्ये कोल्हापुरी चप्पलचे सादरीकरण करण्यात आले असून, ती मूळची कोल्हापूर शहरातील कारागिरांची निर्मिती आहे.

Kolhapuri Chappal | esakal

भारतीय फॅशनची चोरी

स्कॅन्डिनेव्हियन स्कार्फप्रमाणेच परदेशातील फॅशन उद्योग हा पुन्हा एकदा भारतीय फॅशनची चोरी करत आहे, असे नेटिझन्सने म्हटले आहे.

Kolhapuri Chappal | esakal

खुलेआम चोरी

स्कॅडिनेव्हियन स्कार्फ व अन्य लाखो गोष्टीनंतर आता जगातील आमची सर्वात लाडकी कोल्हापुरी चपलेची खुलेआम चोरी केली आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.

Kolhapuri Chappal | esakal

कोल्हापुरी चप्पल

कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरसह कर्नाटकातील चार जिल्ह्यांना कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय मानांकन मिळाले आहे. अशी नजाकत असणारी कोल्हापुरी चप्पल आहे.

Kolhapuri Chappal | esakal

शेकडो डॉलरमध्ये विक्री

प्राडा आता शेकडो डॉलरमध्ये कोल्हापुरी चप्पलची विक्री करत असताना ही कलाकृती जिवंत ठेवणाऱ्या कारागिरांना कोणतेही श्रेय मिळत नाही आणि मानधनही नाही देत नाही.

Kolhapuri Chappal | esakal

कातडी सँडल असा उल्लेख

प्राडा कंपनीच्या शोमध्ये जे कातडी सँडल सादर करण्यात आले ते पूर्णपणे कोल्हापुरी आहे. कारण त्याला टी शेपमध्ये पट्टा, अंगठा, वादी, कान असे सर्व काही आहे.

Kolhapuri Chappal | esakal
आणखी पाहा...