Sandeep Shirguppe
‘प्राडा’ने उन्हाळी फॅशन महोत्सवात कोल्हापुरी चप्पलचा वापर केला; पण त्यामध्ये कोल्हापूरच्या नावाचा, कलेचा उल्लेख केला नव्हता.
यावर कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्सकडून जोरदार आवाज उठवल्यानंतर प्राडाने याची दखल घेऊन त्यांची टीम कोल्हापुरात दाखल झाली.
इटलीमधील प्राडा कंपनीची सहा सदस्यांची ‘टेक्निकल टीम’ थेट कोल्हापुरात येत कोल्हापुरी चप्पलची निर्मीती जाणून घेतली.
कोल्हापुरी चप्पलची बनवतानाची हस्तकला पाहून प्राडाची टीम भारावून गेली. अन् याचा अहवाल ते बिझनेस टीमला सादर करणार आहेत.
पथकामध्ये पाओलो टिव्हरॉन, डॅनिएल कोंटू, आंद्रिया पोलास्ट्रेली, रॉबर्टो पोलास्ट्रेली, अँड्रिया बॉस्करो, गौतम मेहरा हे आले आहेत.
कोल्हापुरी चप्पल नेमकी कशी बनते, त्यासाठी कोणते मटेरियल वापरले जाते, कोणकोणत्या व्हरायटींमध्ये त्या बनवल्या जातात, याची त्यांनी पाहणी केली.
कोल्हापुरी चप्पलांचे पट्टे, वेणी आणि जे चप्पल ‘प्राडा’ने फॅशन महोत्सवात वापरले ते ‘मौजे कापशी पुडा’ चप्पल मागितले आणि ते सोबत नेले.
कोल्हापुरी चप्पलसह साज, ठुशी, पैंजण, पैठणी, आदिवासी महिलांच्या वारली गारमेंट जगभरात पोहोचविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही ‘प्राडा’ने दिली.