Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. प्राजक्ता अभिनयासोबतच तिच्या वयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते.
ती लग्न कधी करणार? याची उत्सुकतानेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये असते.
अशातच प्राजक्ताचे काही जुने फोटो व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये ती एका मुलासोबत आहे.
ही चर्चा संपते न संपते आता प्राजक्ताच्या ब्रेकअपची चर्चा जोर धरत आहे. प्राजक्ताचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती तिच्या ब्रेकअपबद्दल बोलतेय.
प्राजक्ताने सांगितलं की, '5 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात एक मुलगा होता. जो वारंवार माझ्याशी खोट बोलायचा, त्याला मी पुरव्यानिशी सिद्ध केलं की, तो खोटा आहे.'
प्राजक्ता पुढे म्हणाली की, 'ब्रेकअपनंतर माझी फार वाईट अवस्था झाली होती. मी सीन करताना अचानक खाली पडले.'
'मला नव्हतं माहित मी काय विचार करतेय? पण दिग्दर्शकाने डायलॉगची आठवण करुन दिली आणि विचारलं.. तु पडली ते तुला आठवतं का? मला त्यावेळी काहीच आठवत नव्हतं.'
प्राजक्ता म्हणते, 'आता माझ्या आयुष्यात लोक येतात. मी प्रेमात पडते पण ते जास्त टिकत नाही.'