Apurva Kulkarni
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनय आणि डान्सचा जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलीय.
दरम्यान रक्षाबंधननिमित्त प्राजक्ता माळीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ताने तिचे लहानपणीचे भावासोबतचे फोटो शेअर केलेलं पहायला मिळतय.
या फोटोमध्ये प्राजक्ता आणि तिचा भाऊ सत्यानारायण पुजेला नमस्कार करताना दिसत आहेत.
दुसऱ्या फोटोमध्ये प्राजक्ताने तश्याच पोजमधला भावासोबतचा सत्यनारायण पुजेला नमस्कार करतानाचा फोटो केलाय.
प्राजक्ताने शेअर केलेले फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत.
अनेक चाहते तिच्या फोटोवर कमेंट्स करत 'किती गोड दिसतेय' अशा कमेट्स करताना दिसत आहेत.