kimaya narayan
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका आहे. सोशल मीडियावरही ती काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.
प्राजक्ताची एक उत्तम अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून ओळख आहे. अभिनेत्री म्हणून तिने एक स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
तर सोशल मीडियावरही तिची लोकप्रियता खूप आहे. तिचे आता इंस्टाग्रामवर 2.3 मिलियन फॉलोअर्स आहे.
प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या प्राजक्ताने आजवर अनेक प्रोजेक्टसमध्ये काम केलं आहे. पण तिला पहिली प्रसिद्धी मिळाली ती जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून. तर तिची सुवासिनी ही मालिकाही गाजली होती.
अनेकांना सुवासिनी ही प्राजक्ताची पहिली मालिका वाटते पण तसं नाहीये. प्राजक्ताची पहिली मालिका आहे फिरुनी नवी जन्मेन मी. मी मराठी या वाहिनीवर ही मालिका प्रसारित व्हायची.
तर प्राजक्ताचा पहिला सिनेमा होता तांदळा. या सिनेमात तिने आसावरी जोशींच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती.
यशस्वी अभिनेत्री असलेली प्राजक्ता आता निर्मातीही झालीये. तिने फुलवंती या सिनेमाची निर्मिती केली आहे.
याशिवाय ती बिझनेस वुमन आहे. तिचा प्राजक्तराज नावाचा दागिन्यांचा ब्रँड आहे.
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्याने ऋषिकेशमध्ये उरकला साखरपुडा ; कोण आहे होणारी बायको ?