Sandip Kapde
प्राजक्ता माळी सध्या तिच्या ब्रेकअपबाबतच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
तिच्या मते तिचा एक्स बॉयफ्रेंड सतत खोटं बोलायचा, त्यामुळे तिने नातं तोडलं.
त्या खोटेपणाचा मानसिक परिणाम तिच्यावर होत होता, असं ती म्हणाली.
तिने स्वतःसाठी ठाम निर्णय घेत ब्रेकअप केल्याचं स्पष्ट केलं.
प्राजक्ताच्या या कबुलीनंतर चाहत्यांमध्ये "कोण होता बॉयफ्रेंड?" याची उत्सुकता वाढली.
'वाय' सिनेमाच्या शुटींगदरम्यानच प्राजक्ताचं ब्रेकअप झालं होतं.
शुटींगदरम्यान एका सीनमध्ये प्राजक्ता भावनिक अवस्थेमुळे पडली होती.
ती म्हणाली, “ब्रेकअपमुळे मला काय सुरु आहे काहीच कळत नव्हतं.”
"मी माझ्या झोनमध्ये होते, कुणाशीच संवाद नसायचा," असं तिने सांगितलं.
'वाय' चित्रपट हा वास्तवाशी जोडलेला थरारपट आहे.
चित्रपटाच्या लेखनात अजित वाडीकर आणि स्वप्नील सोज्वळ यांचा सहभाग आहे.
प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवण्यासाठी कलाकारांची नावं आणि कथानक गुपित ठेवण्यात आलं होतं.