Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर लाखोचा चाहतावर्ग निर्माण केलाय.
प्रजाक्ता सध्या हास्यजत्राचं सुत्रसंचलन करताना पहायला मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून ती हास्यजत्रेचं सुत्रसंचलन करतेय.
दरम्यान शोमध्ये प्राजक्ताला नेहमीच फरसाण खाण्यावरून चिडवलं जातं. अनेक वेळा विनोदात तिचं फरसाण खाण्याच्या गोष्टी बोलल्या जातात.
दरम्यान नुकताच एका मुलाखतीत प्राजक्ताने उत्तम खाणं आणि दिनचर्येबाबत सांगितलं आहे. तिने काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल सांगितलय.
ती म्हणाली की, 'जर तुम्ही भरपूर मैदा खाल्ला तर तुम्ही मैद्यासारखे होणार आहात. असं म्हणत तिने गाल फुगवत लठ्ठ होण्याचे हावभावही करुन दाखवले आहेत.'
यावेळी तिने चांगलं आरोग्य राहण्यासाठी काय करता येईल याबाबत मोलाचा सल्लाही दिला आहे.
ती म्हणाली की, 'मी खूप फरसाण खाते असं बोललं जातं. परंतु असं नाहीय मी फक्त मटकीची भाजी, किंवा दोडक्याची भाजी अशा भाज्यात फरसाण टाकून खाते.'