Payal Naik
मराठी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.
तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिचा फुलवंती चित्रपटही हिट ठरला.
८ ऑगस्ट १९८९ रोजी जन्मलेली प्राजक्ता एक कवयित्री देखील आहे. ती एक बिझनेसवूमनदेखील आहे.
तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आहे. सोबतच तिचं फार्महाउसदेखील तिने भाड्याने दिलंय.
मात्र अभिनेत्री म्हटली की भरमसाठ खर्च आला. प्राजक्ताने देखील तिचा महिन्याच्या खर्चाचा आकडा सांगितलाय.
प्राजक्ता म्हणते, मी कमी रिसोर्सेसमध्ये राहाते. कपडे लवकर फेकून देत नाही किंवा उगीचच गोष्टी खरेदी करत नाही.
आधीचं मेकअपचं सामान असेल असेल तर दुसरं सामान खरेदी करत नाही. शिवाय नवीन भांडीही घेत नाही.
माझ्यावर कर्जाचं खूप ओझं आहे. त्यामुळे त्याचे हप्ते मला भरावे लागतात. म्हणून खर्चावर जरा नियंत्रण आहे.
तरीही साधारण महिन्याला लाखभर रुपये खर्च होतात, असं प्राजक्ता म्हणाली. यापूर्वी तिने पन्नासेक हजारांचा आकडा सांगितला होता.
आता तिचा सगळ्यात जास्त खर्च हा हफ्ते देण्यावर होतो. आणि स्वतःसाठी काही गोष्टी घेण्यात होतो असं ती म्हणालीये.
मीना कुमारीच्या कबरी शेजारी कुणाला दफन केलंय माहितीये?