Apurva Kulkarni
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांच्या लाडका सुपरस्टार अभिनेता म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे याला ओळखलं जातं.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन 16 डिसेंबर 2004 रोजी झाला.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे दोन लग्न झालं होतं. पहिली रुही बेर्डे आणि दुसरी प्रिया बेर्डे
परंतु लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नी रुही बेर्डेबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. रुही बेर्डे या एक उत्तम अभिनेत्री होत्या.
लक्ष्मीकांत बेर्डे आणि रुही यांची ओळख 'वेडी माणसं' नाटकामध्ये झाली. त्यानंतर 1983 साली रुही आणि लक्ष्मीकांत यांनी लग्न केलं.
परंतु दोघांचा संसार जास्त काळ टिकला नाही. 15 वर्षाच्या संसारानंतर रुही बर्डे यांचं निधन झालं.
गाडीमधून येत असताना अचानक त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास सुरु झाला, आणि काही दिवसाच्या उपचारानंतर त्यांचं निधन झालं.
रुही हिच्या निधनानंतर लक्ष्मीकांत बेर्डे खूप खचून गेले होते. अनेक दिवस ते कोणाशीही बोलले नाही.