Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्राजक्ताचा 'फुलवंती' चित्रपट प्रेक्षकांना फार भावला. तिच्या चित्रपटातील अभिनयाचं सर्वांनी कौतूक केलं.
दरम्यान प्राजक्ताने चित्रपटाला 6 महिने झाले म्हणून एक पोस्ट सोशल मीडियावर तिने शेअर केली आहे.
पोस्ट करत तिने छान कॅप्शनही दिलं आहे. 'माझ्या हृदयाचा तुकडा असलेल्या फुलवंतीला आज 6 महिने पूर्ण झाले'
तिच्या पोस्टला चाहत्यांच्या कमेंट सुद्धा येत आहे. चाहते कमेंट करत तिच्या चित्रपटाचं कौतूक करत आहेत.
एका चाहत्याने म्हटलंय की, 'चित्रपटातील अभिनय,संगीत, वाद्य सगळंकाही उत्तम होतं'
चाहत्यांना तिचा 'फुलवंती' चित्रपटातील अभिनय खूप आवडला आहे. चित्रपटात प्राजक्ताने अभिनयासह उत्तम नृत्यकलाही प्रेक्षकांना दाखवून दिली आहे.
तर दुसऱ्या चाहत्यांनी प्राजक्ताचं कौतूक केलय. त्याने म्हटलं की,'उत्तम चित्रपट आहे. प्राजक्ताचा फुलवंती चित्रपटातील अभिनय उत्तम होता.'