Apurva Kulkarni
प्राजक्ता माळी हिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
नुकतच प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमुळे प्राजक्ताचा हटके अंदाज दिसून येतोय.
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने आकाशी कलरचा ड्रेस घातला आहे. त्यावर वर्क केलेली लाल ओढणी घेतली आहे.
त्याचबरोबर प्राजक्ताने मोकळे केस रोडत मोठे डायमंडचे कानातले सुद्धा घातले आहेत. त्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
फोटो पोस्ट करत तिने छान कॅप्शन सुद्धा दिलं आहे. तिने लिहलंय की, 'हे गाणं विसरुन चालणार नाही.. माझ्या बऱ्याच वर्षाच्या आवडत्या व्यक्तीने लिहिलेलं.'
प्राजक्ताने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले आहेत. चाहत्यांना तिचा लूक प्रचंड आवडला आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोला चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहे.