Anuradha Vipat
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' हा सिनेमा गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला.
प्राजक्ता माळी निर्मित या चित्रपटाने अलीकडेच थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केले आहेत
कोणत्याही सिनेमासाठी हा एक मोठा टप्पा मानला जातो.
प्राजक्तासाठीही ही एक मोठी गोष्ट आहे कारण तिने पहिल्यांदाच निर्मिती केलेल्या सिनेमाला हा दिवस पाहायला मिळाला आहे
प्राजक्ताने 'फुलवंती'च्या यशाबद्दल एक व्हिडिओ शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
प्राजक्ता माळीने ही पोस्ट शेअर करताना लिहिले की, 'मागे वळून पाहताना…आज "फुलवंती"ला चित्रपटगृहात ५० दिवस पुर्ण झाले
पुढे प्राजक्ता माळीने ही पोस्ट शेअर करताना लिहिले की, हल्ली इतर अनेक माध्यमांमुळे, सोशल मीडियासारख्या असंख्य गोष्टींमुळे, खूप कमी चित्रपटांच्या नशिबात हा सुदिन येतो. आम्ही खरेच भाग्यवान.