Mayur Ratnaparkhe
प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ सोडली आहे.
प्रकाश महाजन यांनी मनसेच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
प्रकाश महाजन हे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे धाकटे बंधू आहेत.
प्रकाश महाजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रीय होते.
मराठवाड्यातील प्रमुख नेता म्हणून प्रकाश महाजन यांची ओळख होती आणि त्यांचा प्रभाव होता.
प्रकाश महाजन हे टेलिव्हिजनवरील चर्चा सत्रात मनसेची भूमिका अगदी ठामपणे मांडायचे.
मागील काही दिवसांपूर्वीच त्यांचा माजीकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत शाब्दिक वाद रंगला होता.
मागील काही दिवसांपासून पक्षात योग्य मान मिळत नसल्याने प्रकाश महाजन हे काहीसे नाराज दिसत होते.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला मोठा धक्का मानला जात आहे.
Anjeer Water Benefits
esakal