कोण आहेत प्रकाश शाह? 75 कोटींची नोकरी सोडून घेतला संन्यास

संतोष कानडे

रिलायन्स

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या अत्यंत जवळचे आणि कंपनीत अत्यंत वरिष्ठ पदावर असलेले प्रकाश शाह.

प्रकाश शाह

प्रकाश शाह यांनी आपला हायप्रोफाईल जॉब आणि ७५ कोटी रुपयांची नोकरी सोडून संन्यास घेतला आहे.

कौशल्य

व्यवसायिक कौशल्य आणि नेतृत्वगुणांसाठी प्रसिद्ध असलेले प्रकाश शाह आणि त्यांच्या पत्नी नैना शाह यांनी महावीर जयंतीच्या औचित्याने दीक्षा घेतली.

व्हाईस प्रेसिडेंट

प्रकाश शाह हे रिलायन्स कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होते. कंपनीच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

करिअर

यशस्वी करिअर आणि सुखी गृहस्थी जीवन मागे सोडून त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला.

सोशल मीडियात

त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. ज्यात ते पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसून येत आहेत.

परिवर्तन

अत्यंत कमी सामान आणि अनवाणी पायाने चालताना ते दिसून येत आहेत. जीवनात एवढं मोठं परिवर्तन करणं आश्चर्यकारक आहे.

अध्यात्म

शाह यांना जैन दर्शन आणि अध्यात्मामध्ये सुरुवातीपासूनच रस होता, असं त्यांच्या जवळचे लोक सांगतात.

इंजिनिअर

प्रकाश शाह हे केमिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बे येथून पोस्ट ग्रॅज्युएट केलं.

७५ कोटी रुपये वेतन

त्यांनी अनेक मोठमोठी पदं भूषवली आणि ७५ कोटी रुपये वेतन घेण्याचा रेकॉर्ड केला. आता मात्र त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे.

गडांवर तुपाच्या विहिरी का असायच्या?

<strong>येथे क्लिक करा</strong>