सकाळ डिजिटल टीम
छत्रपती शिवाजी महाराजांना प्रतापगडावर तुळजापूरच्या तुळजाभवानीचे रूप हवे होते, यासाठी नेपाळमधील गंडकी नदीच्या संगमावरून विशेष शाळीग्राम शिळा मागवून घेण्यात आली होती.
Shivaji Maharaj, Pratapgad Bhavani Mata; Connection to Nepal
sakal
नेपाळच्या पवित्र गंडकी पाषाणावरून तुळजापूरहून कारागीर बोलावून अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची अत्यंत सुरेख मूर्ती घडवून घेण्यात आली.
Shivaji Maharaj, Pratapgad Bhavani Mata; Connection to Nepal
sakal
ऐतिहासिक नोंदीनुसार साधारण जुलै १६६१ मध्ये प्रतापगडावरील भवानी मंदिरात या पवित्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
Shivaji Maharaj, Pratapgad Bhavani Mata; Connection to Nepal
sakal
महाराजांनी गडावर देवीची स्थापना करून नियमित पूजाअर्चा आणि नवरात्रोत्सवासाठी विविध नेमणुका केल्या, ज्यामुळे शिवकाळापासूनच तिथे नवरात्रोत्सव सुरू झाला.
Shivaji Maharaj, Pratapgad Bhavani Mata; Connection to Nepal
sakal
जयराम पिंड्ये यांच्या 'पर्णालपर्वतग्रहणाख्यान' या ग्रंथात शिवाजी महाराज अनवाणी पायाने मंदिरात गेल्याचे आणि सोन्याच्या मुलाम्याच्या खांबांचे सुंदर वर्णन आढळते.
Shivaji Maharaj, Pratapgad Bhavani Mata; Connection to Nepal
sakal
देवीच्या अंगावर पैंजण, हिऱ्यांचा कमरपट्टा, मोत्यांचा हार, नथ आणि आठ आयुधे धारण केलेली प्रत्यक्ष महिषासुरमर्दिनीच भासावी अशी ती देखणी मूर्ती होती.
Shivaji Maharaj, Pratapgad Bhavani Mata; Connection to Nepal
sakal
प्रतापगडावर श्री भवानी देवीची स्थापना करून महाराजांनी मोठा दानधर्म केला आणि देवीस विविध रत्नालंकार व दागिने अर्पण केले.
Shivaji Maharaj, Pratapgad Bhavani Mata; Connection to Nepal
sakal
देवीस साष्टांग नमस्कार करून पूजाअर्चना केल्यावर महाराज त्या रात्री गडावरच थांबले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे देवीस वंदन करून पन्हाळगडाच्या दिशेने रवाना झाले.
Shivaji Maharaj, Pratapgad Bhavani Mata; Connection to Nepal
sakal
ऋग्वेदातील उल्लेखापासून ते बुद्धांच्या काळापर्यंत; किती जुनी आहे गंगा नदी?
Origin of River Ganga
sakal