'प्री-डायबिटीज'ची 'ही' लक्षणं ओळखण्यात चूक करू नका!

Aarti Badade

प्री-डायबिटीज म्हणजे काय?

प्री-डायबिटीज ही अशी स्थिती आहे जिथे रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असते, पण ती पूर्णपणे मधुमेहाच्या (Diabetes) श्रेणीत नसते.

Pre-Diabetes Warning signs

|

Sakal

जीवनशैलीतील बदलांचा परिणाम

धावपळीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे प्री-डायबिटीजचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.

Pre-Diabetes Warning signs

|

Sakal

सतत तहान लागणे आणि लघवी होणे

शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने मूत्रपिंडांवर ताण येतो; परिणामी उन्हाळ्यात पाणी पिऊनही सतत तहान लागते आणि वारंवार लघवीला जावे लागते.

Pre-Diabetes Warning signs

|

Sakal

सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

जेव्हा शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोजचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा पुरेशी झोप घेऊनही दिवसभर थकवा, आळस आणि अशक्तपणा जाणवू लागतो.

Pre-Diabetes Warning signs

|

Sakal

दृष्टी धूसर होणे (Blurred Vision)

रक्तातील साखरेच्या पातळीत सतत चढ-उतार झाल्यामुळे डोळ्यांच्या लेन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे अचानक जवळचे किंवा लांबचे धूसर दिसू शकते.

Pre-Diabetes Warning signs

|

Sakal

हात-पायांना मुंग्या येणे

जर तुम्हाला वारंवार हात-पायांना मुंग्या येत असतील, जळजळ होत असेल किंवा बधिरपणा जाणवत असेल, तर हे प्री-डायबिटीजचे गंभीर संकेत असू शकतात.

Pre-Diabetes Warning signs

|

Sakal

वेळीच तपासणी करणे गरजेचे

या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित रक्तातील साखरेची तपासणी (HbA1c/Fasting) करून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला आवर्जून पाळा.

Pre-Diabetes Warning signs

|

Sakal

BP ची औषधे घेताना 'ही' चूक टाळा!

BP Medicine Timing

|

Sakal

येथे क्लिक करा