Anushka Tapshalkar
गरोदरपण हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात स्वत:ची काळजी घेणं हे बाळाच्या वाढीसाठीही अत्यंत आवश्यक असते.
चांगला, चौरस व सकस आहार घेतला तर गरोदरपणाच्या आधीसुद्धा स्त्रीची तब्येत आरोग्यपूर्ण राहते व बाळ सुदृढ होते.
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही दिवस स्त्रीला याविषयी माहिती नसते. त्या काळात गर्भाची महत्त्वाची वाढ होत असते. यासाठी विविध जीवनसत्त्वांची गरज भासते.
साधारणत: गरोदरपणाच्या नऊ महिन्यांत १० ते १२ किलो वजन वाढले पाहिजे. त्याहून अधिक वजन वाढले तर त्रास होऊ शकतो.
रोज आहारात फळं, भाज्या, दूध, डाळी हे पदार्थ घेणे गरजेचे आहे. यातून शरीराला एक भक्कम पाया मिळतो.
गर्भधारणा झाल्यानंतर डाएटिंग करण्याची गरज नसते. पण अति खाणेही टाळले पाहिजे.
गरोदरपणात प्रथिनांचे प्रमाण वाढवायला पाहिजे. न्याहारीत दूध किंवा दही व दोन्ही वेळच्या जेवणात डाळ, कडधान्ये किंवा मटण-मासे असावे.
फ्रूट ज्यूस, व्हेजिटेबल ज्यूस न घेता फळे खाणे, ब्रेड-नॉनऐवजी चपाती, पराठे खाणे असे आहारात छोटे छोटे बदल करणे महत्त्वाचे असते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.