Shubham Banubakode
अंतराळात महिला आणि पुरुष अंतराळवीर एकत्र काम करतात. त्यामुळे शून्य गुरुत्वाकर्षणात गर्भधारणा होऊ शकते का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
Pregnancy in Space
esakal
अंतराळ मोहिमेदरम्यान महिला अंतराळवीर गर्भवती झाल्यास आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जाते.
Pregnancy in Space
esakal
अंतराळात गर्भधारणेचे धोके लक्षात घेता, अंतराळवीरांसाठी शारीरिक संबंधांबाबत मनाई केली जाते.
Pregnancy in Space
esakal
अंतराळात कीटक आणि त्यांच्या संततीवर काही प्रयोग करण्यात आले आहेत. मात्र, मोठ्या प्राण्यांमधील गर्भधारणेबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
Pregnancy in Space
esakal
तज्ज्ञांच्या मते, अंतराळातील रेडिएशन आणि गुरुत्वाकर्षणाचा अभाव गर्भाच्या विकासावर परिणाम करू शकतो. त्यामुळे गर्भाच्या आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतात.
Pregnancy in Space
esakal
अंतराळात दीर्घकाळ राहिल्याने स्नायू कमकुवत होतात आणि हाडांची ताकद कमी होते. अशा परिस्थितीत गर्भधारणेचा शरीरावर अतिरिक्त ताण पडू शकतो.
Pregnancy in Space
esakal
नासाशी संबंधित अभियंता जोनाथन मिलर यांच्या म्हणण्यानुसार, गुरुत्वाकर्षण नसल्याने शरीर स्थिर ठेवणं कठीण असतं. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवणंही आव्हानात्मक असतं.
Pregnancy in Space
esakal
मानवी गर्भधारणा आणि बाळाचा विकास अंतराळात कसा होईल, याबाबत पुरेसा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे यावर ठोस निष्कर्ष काढणं सध्या कठीण आहे.
Pregnancy in Space
esakal
Ambabarwa Wildlife Sanctuary
esakal