Anuradha Vipat
अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी अनेक रिॲलिटी शोचा चेहरा बनली आहे.
'ग्लॅम फेम सीझन1 "ची ती जज बनली आहे. ईशा गुप्ता आणि नील नितीन मुकेश यांच्यासोबत ती या शोला जज करणार आहेत.
या शोमध्ये डब्बू रत्नानी, रोहित खंडेलवाल, दिनेश शेट्टी आणि संतोषी शेट्टी यांच्यासह काही प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील सहभागी होणार आहेत.
ग्लॅम फेम शो आणि जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया वरून ही माहिती दिली आहे.
ग्लॅम फेम शो हे ग्लॅम फॅशनच्या जगात ठसा उमटवू इच्छिणाऱ्या स्पर्धकाला जागतिक स्तरावर व्यासपीठ मिळवून देणार आहे.
काही दिवसांपूर्वी सनी लिओनीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात असे म्हटले आहे की, “ग्लॅम फेम सीझन – 1 जज "