Aarti Badade
आजच्या धावपळीच्या जीवनात आपण मोबाईल आणि कामासाठी झोपेशी तडजोड करतो, पण हीच सवय तुमच्या आयुष्यासाठी घातक ठरू शकते.
Better Sleep Tips
Sakal
अमेरिकेतील ओरेगॉन विद्यापीठाच्या संशोधनानुसार, दररोज किमान ७ तासांची झोप घेणे केवळ थकवा घालवण्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहे.
Better Sleep Tips
Sakal
संशोधकांच्या मते, जे लोक ७ तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्यांच्यामध्ये अकाली मृत्यूचा आणि गंभीर आजारांचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
Better Sleep Tips
Sakal
झोपेत असताना मेंदू ताजेतवाने होतो, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि आपली स्मरणशक्ती सुधारण्याची महत्त्वाची प्रक्रिया घडते.
Better Sleep Tips
Sakal
सकाळी उठल्यावरही डुलक्या येणे, कामात लक्ष न लागणे, विसरभोळेपणा आणि सतत चिडचिड होणे ही अपुऱ्या झोपेची मुख्य लक्षणे आहेत.
Better Sleep Tips
Sakal
झोप पूर्ण न झाल्यास हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारखे दीर्घकालीन आजार जडण्याची शक्यता वाढते.
Better Sleep Tips
Sakal
मानसिक तणाव, स्क्रीन टाइम (मोबाईल), खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि शारीरिक श्रमाचा अभाव यामुळे झोपेचे चक्र विस्कळीत होते.
Better Sleep Tips
Sakal
शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही बंद ठेवावा; त्याऐवजी एखादे पुस्तक वाचावे.
Better Sleep Tips
sakal
झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एकच वेळ निश्चित करा. सुट्टीच्या दिवशीही हे वेळापत्रक पाळल्यास शरीराला नैसर्गिक झोपेची सवय लागते.
Better Sleep Tips
Sakal
उत्तम आरोग्यासाठी ७ ते ९ तासांची गाढ झोप घ्या, नियमित व्यायाम करा आणि तणावमुक्त राहून दीर्घायुष्याचा आनंद घ्या!
Better Sleep Tips
Sakal
Dark chocolate benefits for women
Sakal