Aarti Badade
ग्लॉकोमा किंवा काचबिंदू हा असा आजार आहे जो कोणत्याही वेदनेशिवाय तुमची दृष्टी हळूहळू कायमची हिरावून घेऊ शकतो.
Glaucoma Blindness eye Symptoms
Sakal
या आजारात डोळ्यांमधील द्रवाचा दाब वाढतो, ज्यामुळे मेंदूला दृश्य माहिती पोहोचवणारी 'ऑप्टिक नर्व्ह' कायमची निकामी होते.
Glaucoma Blindness eye Symptoms
Sakal
काचबिंदू सुरुवातीला बाजूच्या दृष्टीवर परिणाम करतो, त्यामुळे समोरचे स्पष्ट दिसत असल्याने रुग्णाला आजाराची जाणीव होत नाही.
Glaucoma Blindness eye Symptoms
Sakal
अंधुक दृष्टी, डोळ्यांमध्ये जडपणा, तीव्र डोकेदुखी किंवा दिव्यांच्या प्रकाशाभोवती वर्तुळे दिसणे ही काचबिंदूची मुख्य लक्षणे आहेत.
Glaucoma Blindness eye Symptoms
Sakal
वयाची चाळीशी ओलांडलेले लोक, मधुमेही आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना काचबिंदू होण्याचा धोका जास्त असतो.
Glaucoma Blindness eye Symptoms
Sakal
कुटुंबात कोणाला काचबिंदू असल्यास किंवा दीर्घकाळ स्टिरॉइड औषधे घेत असल्यास डोळ्यांची नियमित तपासणी करणे अनिवार्य आहे.
Glaucoma Blindness eye Symptoms
Sakal
एकदा काचबिंदूमुळे दृष्टी गेली की ती पुन्हा मिळवणे अशक्य असते, म्हणूनच लवकर निदान आणि उपचार हाच एकमेव मार्ग आहे."
Glaucoma Blindness eye Symptoms
Sakal
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर दरवर्षी तज्ज्ञ डॉक्टरांकडून डोळ्यांचा दाब तपासून घेणे हा दृष्टी वाचवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.
Glaucoma Blindness eye Symptoms
Sakal
Best seeds for diabetics
Sakal