सूरज यादव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून पाच देशांच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी पंतप्रधान मोदी युएईमध्ये दाखल झाले आहेत.
PM Narendra Modi
Esakal
पंतप्रधान मोदींचा परदेश दौरा १५ मे ते २० मे या कालावधीत युएई, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांमध्ये असणार आहे.
PM Narendra Modi
Esakal
युनायटेड अरब अमिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगळं वेगळं स्वागत झालं. पंतप्रधान मोदींच्या विमानाचं आकाशातच लढाऊ विमानाने स्वागत केलं गेलं.
PM Narendra Modi
Esakal
अबु धाबी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी युएईचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान हे होते. पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.
PM Narendra Modi
Esakal
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे ऊर्जा संकट भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि युएई यांच्यात एलपीजी पुरवठ्याबाबत ऊर्जा करार झाला.
PM Narendra Modi
Esakal
पेट्रोलियम साठ्यासंदर्भात दोन्ही देशात करार झाला आहे. युएईने भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरबीएलमध्ये ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केलीय.
PM Narendra Modi
Esakal
युएईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोप दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात चार देशांच्या प्रमुखांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.
PM Narendra Modi
Esakal
पंतप्रधान मोदी १९-२० मे रोजी इटलीला जातील आणि त्यानंतर मायदेशी परतणार आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही ते भेट घेणार आहेत.
PM Narendra Modi
Esakal
first petrol pump india
Esakal