Saisimran Ghashi
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण ताजमहालचे जागा मालक मुघल नाही, तर भारतातील एक उपमुख्यमंत्री आहेत
राजकुमारी दिया कुमारी या जयपूरच्या माजी महाराजा सवाई भवानी सिंह व पद्मिनी देवी यांची एकुलती एक मुलगी आहेत. त्या जयपूर राजघराण्याशी संबंधित आहेत, जे स्वतःला भगवान रामाचे वंशज मानतात.
दिया कुमारी यांनी दावा केला आहे की ताजमहाल हा मुळात त्यांच्या कुटुंबाचा राजवाडा होता, जो नंतर मुघल सम्राट शाहजहानने ताब्यात घेतला.
त्यांनी सांगितले की त्यांच्या ट्रस्टकडे ताजमहाल त्यांच्या मालकीचा असल्याचे पुरावे दर्शवणारी कागदपत्रे उपलब्ध आहेत, आणि गरज पडल्यास ते न्यायालयात सादर करणार आहेत.
सध्या ताजमहाल संबंधित प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या दाव्यामुळे पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
जयपूर राजघराण्याचे मूळ आमेर पासून आहे. त्यांचे पूर्वज मान सिंग हे मुघल सम्राट अकबराच्या नवरत्नांपैकी एक होते. महाराज भवानी सिंह हे भगवान रामाच्या पुत्र कुश यांचे ३०९वे वंशज होते, असे मानले जाते.
दिया कुमारी यांनी दिल्ली, जयपूर व नंतर लंडनमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी १९९७ मध्ये नरेंद्र सिंह नावाच्या सामान्य व्यक्तीशी प्रेमविवाह केला होता, मात्र २१ वर्षांनी २०१८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
दिया कुमारी यांना तीन मुले आहेत: मोठा मुलगा पद्मनाभ सिंह (जो राजगादीचा वारस आहे), दुसरा मुलगा लक्ष्यराज, आणि मुलगी गौरवी.
त्यांनी आपल्या आजी राजमाता गायत्री देवी यांच्या मार्गावर चालत राजकारणात प्रवेश केला. त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या असून सध्या राजसमंद लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.
ताजमहालप्रकरणी दिलेला दावा, त्यांचा राजघराण्याशी असलेला संबंध, व त्यांचे राजकारणातील स्थान यामुळे त्या वारंवार चर्चेत येतात.