३९ व्या वर्षीही विशीतली कशी दिसते प्रिया बापट? कोणतंही सिक्रेट नाही तर 'या' गोष्टी करते फॉलो

Payal Naik

हिंदीमध्ये

मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे. मराठीसोबतच हिंदीमध्येही ती घट्ट पाय रोवून उभी आहे.

PRIYA BAPAT

|

ESAKAL

चर्चा

तिच्या दमदार अभिनयाची कायमच चर्चा होत असते. मात्र त्याऑस्बतच तिच्या दिसण्याची आणि फिटनेसचीही चाहत्यांमध्ये चर्चा रंगते.

PRIYA BAPAT

|

ESAKAL

सौंदर्याचं रहस्य

प्रिया सध्या ३९ वर्षाची आहे. मात्र ती अजूनही अगदी विशीतली दिसते. तिच्या या फिटनेसचं आणि सौंदर्याचं काय रहस्य आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

PRIYA BAPAT

|

ESAKAL

वर्कआऊटचे व्हिडिओ

प्रिया कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. ती अनेकदा चाहत्यांसोबत तिचे वर्कआऊटचे व्हिडिओ शेअर करताना दिसते.

PRIYA BAPAT

|

ESAKAL

भरपूर पाणी

आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या फिटनेसचं सिक्रेट सांगितलंय. नुकत्याच न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत प्रिया म्हणाली, "मी नियमित व्यायाम करते. भरपूर पाणी पिते. पोषक आहार घेते."

PRIYA BAPAT

|

ESAKAL

आवडतही नाही

ती पुढे म्हणाली, 'मला खूप गोड आवडतं. पण तेही मी प्रमाणातच खाते. मी अजिबातच खादाड नाही. वडापाव, फ्रँकी, बर्गर, पिझ्झा खाल्लं असं फारसं होत नाही. मुळात मला ते आवडतही नाही."

PRIYA BAPAT

|

ESAKAL

बाहेरचा खाऊ

"वरण भात, उसळ, कोशिंबीर, भाकरी हे आहारात असेल तर मी जास्त सुखी असते. याच्यापलीकडे कधीतरी काही खाल्लं तर ठिके पण सारखं बाहेरचं खाऊन मला जगता येत नाही.''

PRIYA BAPAT

|

ESAKAL

जबरदस्ती नाही

"मी फळं भरपूर खाते आणि मला ते खरंच आवडतात. या सगळ्यासाठी मला कोणीही जबरदस्ती करत नाही किंवा हे असंच केलं पाहिजे म्हणून मी हे करत नाही. तर हे मला खरंच आवडतं.''

PRIYA BAPAT

|

ESAKAL

साडेसातच्या आत

''खूप वर्षात हेच माझ्या जीवनशैलीचा भाग झालं आहे. रात्री मी वेळेत साडेसातच्या आत जेवते." असं प्रिया म्हणाली.

PRIYA BAPAT

|

ESAKAL

'असंभव'

प्रिया सध्या 'असंभव' या चित्रपटात दिसतेय. यात ती मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांच्यासोबत झळकतेय.

PRIYA BAPAT

|

ESAKAL

'वेड' मधून वेड लावणारा रितेश देशमुख एका चित्रपटासाठी किती पैसे घेतो?

riteish deshmukh

|

esakal

येथे क्लिक करा