Anuradha Vipat
अभिनेत्री प्रिया बापट ही तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते.
प्रिया तिच्या गाण्यांसाठीदेखील ओळखली जाते. प्रियाने गायलेली गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसतात.
आता देखील आता प्रियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका कॉन्सर्टमध्ये गाताना दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना प्रियाने एक पोस्ट देखील लिहिली आहे.
पोस्टमध्ये प्रियाने लिहिलं आहे की, ही जादुई संध्याकाळ मी कायम जपून ठेवेन. इंडियन ओशन कॉन्सर्ट मध्ये लाइव्ह गाणे सादर करेन अशी कल्पनाही केली नव्हती
पोस्टमध्ये प्रियाने लिहिलं आहे की, संगीताबद्दलचे प्रेम एकत्र साजरे करणे हे स्वप्नवत होते. त्यांच्यासोबत त्या मंचावर उभे राहणे हा एक सन्मान होता, जो मी कधीही विसरणार नाही.
पोस्टमध्ये प्रियाने लिहिलं आहे की, मला माझे स्वप्न जगू दिल्याबद्दल आणि ३५ वर्षांपासून हृदयाला भिडलेल्या त्यांच्या अविश्वसनीय संगीताबद्दल मी या दिग्गजांची आभारी आहे.