Anuradha Vipat
प्रियांका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता टीव्हीवरील लोकप्रिय कपल आहे.
‘उडारिया’ मालिकेमध्ये ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती.
प्रियांका आणि अंकित ‘बिग बॉस १६’मध्ये एकत्र सहभागी झाले होते
आता लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, नुकतेच प्रियांकाने या चर्चांवर मौन सोडले आहे.
प्रियांका व अंकित सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात.प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये तिने लिहिले, “सध्या मार्च सुरू आहे. पण असं दिसतंय की, काही मीडिया पोर्टल्सचे ‘एप्रिल फूल’ लवकरच होणार आहे.” प्रियांकाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे