Anuradha Vipat
युवा पॅन इंडिया स्टार राशी खन्ना तिच्या अलीकडील चित्रपट योद्धाच्या रिलीजसाठी तयारी करत असून यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राशीला तिच्या वास्तविक जीवनातील योद्धा कोण. या बद्दल विचारण्यात आले
याला उत्तर देताना राशी म्हणाली, "माझी आई, माझे वडील आणि माझा भाऊ हे माझे योद्धा आहेत. मला वाटते की मी जे काही मिळवले आहे, आज मी जिथे आहे, ते सर्व माझ्या आई-वडील आणि भावाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे शक्य झाले आहे.
'फर्जी' नंतर लोकांच्या तिच्याकडून असलेल्या अपेक्षा खूप आहेत. "लोकांनी मला एक अभिनेत्री म्हणून पाहिलं पण 'फर्जी'नंतर मला एक कलाकार म्हणून मान मिळाला. असंही राशी म्हणाली
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मागणी असलेल्या अभिनेत्रींपैकी एक असलेली राशी आता योद्धा चित्रपटातून बॉलीवूड जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे
सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित, धर्मा प्रॉडक्शन समर्थित हा चित्रपट 15 मार्च रोजी रिलीज होणार आहे.