सकाळ डिजिटल टीम
आंतरराष्ट्रीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने निर्मित केलेला मराठी चित्रपट 'पाणी' आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.
हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध झाला असून, प्रेक्षकांना घरबसल्या पाहण्याची संधी मिळाली आहे.
प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून 'पाणी' चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्याची माहिती दिली.
हा आदिनाथ कोठारे यांचा पहिला दिग्दर्शित चित्रपट असून, त्याने पाणीटंचाईच्या समस्येवर भाष्य केलं आहे.
आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, किशोर कदम, रजित कपूर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत.
नांदेडमधील नागदेरवाडी गावातील सत्य घटनेवर आधारित, पाणीटंचाईवर मात करण्याचा संघर्ष मांडण्यात आला आहे.
चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा, नेहा बडजात्या आणि दिवंगत रजत बडजात्या यांनी केली असून, महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा यांनी सहयोगी निर्मात्याची जबाबदारी सांभाळली आहे.
१८ ऑक्टोबर २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता ओटीटीवर चित्रपटाला संधी मिळाली आहे.
प्रेक्षक ओटीटीवर या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.