सकाळ डिजिटल टीम
२०२४मध्ये अभिनेता आणि निर्माता म्हणून स्वप्नील जोशीने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास रचला.
स्वप्नील जोशी याने २०२४ या वर्षात बॉक्स ऑफिसवर आपले अधिराज्य गाजवले आहे.
निर्माता म्हणून स्वप्नीलच्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाला जागतिक स्तरावर प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.
विनोदी आणि कौटुंबिक कथानकाने सजलेला स्वप्नीलचा हा चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरला, चित्रपटगृहांमध्ये अनेक दिवस हाऊसफुल्ल शो झाले.
स्वप्नीलच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान अधिकच घट्ट केलं.
अभिनेता आणि निर्माता म्हणून स्वप्नील जोशी २०२४मध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च कमाई करणारा कलाकार ठरला.
स्वप्नीलने त्याच्या मेहनतीने आणि नवनवीन संकल्पनांनी मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा उंचावला.