सूरज यादव
अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुंबईतील तिची चार घरं विकली. लग्झरी अपार्टमेंटमधली ही घरं विकून तिला १६ कोटी रुपये मिळालेत.
मुंबईतील अंधेरी ईस्ट परिसरात चार घरं होती. ३ फ्लॅट १८ व्या फ्लोअरवर होते. ते ३.४५ कोटी, ३.५२ कोटी आणि २.८५ कोटींना विकले.
प्रियांकाचं चौथं घर १९ व्या मजल्यावर होतं. ते ६,३५ कोटींना विकण्यात आलं. चार घरांची स्टॅम्प ड्युटी ८३ लाख रुपये इतकी भरण्यात आली.
प्रियांकाने २०२१ मध्ये वर्सोव्यातील दोन घरं विकली होती. त्यानंतर २०२३ मध्येही दोन पेंटहाऊस विकले होते.
प्रियांकाने अनेक ठिकाणी फ्लॅट आणि घरं घेतली आहेत. गोवा, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिसमध्येही तिचं घर आहे.
प्रियांका चोप्रा सध्या पती निक जोनास आणि मुलगी मालती यांच्यासोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते.
प्रियांका चोप्रा लॉस एंजिलिसमध्ये राहते. भारतात फार कमी वेळा येत असल्यानं तिनं मुंबईतील काही घरं विकण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.