Mayur Ratnaparkhe
प्राध्यापक व्ही.एन. पार्थिबन यांनी शिक्षणाला आपले करिअर बनवले आहे.
पार्थिबन हे चेन्नईतील आरकेएम विवेकानंद महाविद्यालयात वाणिज्य विभागाचे प्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.
व्ही.एन. पार्थिबन यांच्याकडे सध्या तीन पीएचडी, १२ एमफीलसह तब्बल १५० पेक्षा जास्त पदव्या आहेत.
यामुळे पार्थिबन यांना लोक प्रेमाने पदवींच्या खजना किंवा चालतं फिरतं विद्यापीठ संबोधतात.
१९८१ पासून, पार्थिबन यांनी अभ्यासाला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग बनवले आहे.
दररोज सकाळी ५ वाजता उठतात आणि रात्री साडेअकरा वाजेपर्यंत अभ्यास करतात.
तसेच पार्थिबन कॉलेजमध्येही शिकवतात आणि कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडतात.
त्यांच्या आयुष्यातील हा असाधारण प्रवास आईला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यापासून सुरू झाला आहे.
Starlink Internet Launch in India 2026
esakal