किडनी राहील फिट! आहारात आजच 'या' 8 पदार्थांचा समावेश करा"

Aarti Badade

कोबी

कमी पोटॅशियम असलेली भाजी असून, त्यात व्हिटॅमिन C आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील विषारी पदार्थ कमी करून मूत्रपिंडाच्या नैसर्गिकरित्या डिटॉक्स प्रक्रियेस मदत करतात.

cabbage | Sakal

ब्लूबेरी

अँथोसायनिन्ससारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मूत्रपिंडांना ऑक्सिडेटिव्ह ताण, जळजळ आणि पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात.

Kidney Health | Sakal

सॅल्मन किंवा इतर मासे

ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचा समृद्ध स्रोत असून, ते रक्तदाब नियंत्रित करतात, जळजळ कमी करतात आणि हृदय व मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारतात.

Kidney Health | Sakal

अंड्याचा पांढरा भाग

उच्च दर्जाचा प्रथिनांचा स्रोत असून, त्यात फॉस्फरस कमी असल्यामुळे तो मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना विशेषतः उपयुक्त ठरतो.

egg white | Sakal

लाल द्राक्ष

रेझवेराट्रोल नावाचा अँटीऑक्सिडंट आढळतो, जो मूत्रपिंडातील जळजळ कमी करून रक्तप्रवाह सुधारतो.

Kidney Health | sakal

सफरचंद

पेक्टिन व अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात आणि मूत्रपिंडांना डिटॉक्स करण्यात मदत करतात.

apple | Sakal

लसूण

नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेटरी आहे, जे कोलेस्टेरॉल कमी करते, जळजळ नियंत्रणात ठेवते आणि मीठ न वापरता आहारात स्वाद वाढवण्याचा उत्तम पर्याय आहे.

garlic | Sakal

फुलकोबी

कमी पोटॅशियम असलेली फायबरयुक्त भाजी असून, तिच्यात दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे ती डिटॉक्स प्रक्रियेस चालना देते आणि मूत्रपिंडासाठी सुरक्षित मानली जाते.

Kidney Health | Sakal

चिकन ६५ हे नाव कसं पडलं ? या पठ्ठ्याने बनवलीय रेसिपी

chicken 65 name history | Sakal
येथे क्लिक करा